Sharad Pawar News: सोलापुरातल्या बार्शीतमध्ये मराठा आंदोलकांनी शरद पवारांना दाखवले काळे झेंडे

Sharad Pawar News : महाविकास आघाडीच्या जागावाटपात बार्शी विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे.

सोलापूरच्या बार्शीत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांना काळे झेंडे दाखवले. यावेळी मराठा आंदोलकांना एक मराठा एक लाख मराठा अशा घोषणा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मेळावा पार पडत आहे. माढा आणि धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचा शरद पवारांच्या हस्ते सत्कार झाला. या मेळाव्यात मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला. मनोज जरांगे आगे बढो, एक मराठा एक लाख मराठा अशा घोषणा मराठा आरक्षण आंदोलकांनी दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या जागावाटपात बार्शी विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. मेळाव्यात शरद पवार भाषण देत असताना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com