Hotel Bhagyeshree: यायलाच लागतंय! हॉटेल भाग्यश्रीचा मालक मराठा आंदोलनात सहभागी; 250 किलो फरसाण, 400 डझन बिस्कीटे अन् २ ट्रक भरून... VIDEO

Maratha Protest Support: मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी दोन ट्रकभर फरसाण, बिस्कीट, पाणी आणि केळी मुंबईला पाठवले. तसेच हॉटेल सहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
Summary

आझाद मैदानावरील उपोषणाचा आज तिसरा दिवस सुरू.

नागेश मडके यांनी दोन ट्रकभर शिदोरी मुंबईला आणली.

250 किलो फरसाण, 400 डझन बिस्कीट, पाणी व केळी आंदोलकांसाठी.

भाग्यश्री हॉटेल सहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील उपोषणाचा तिसरा आज सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईत धडकले आहेत. परंतु या सर्वांची पाणी पिण्याची आणि जेवणाची गैरसोय होत असल्याचा आरोप आंदोलक करत आहे. या आरोपानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकजन जेवणाची शिदोरी पाठवत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी देखील आंदोलकांना पाणी, फरसान, बिस्कीट आणि केळीने भरलेला ट्रक मुंबईला घेऊन आला आहे. तसेच यावेळी त्याने आंदोलन करताना मोठी घोषणा केली. जो पर्यंत आमचे मराठा बांधव खंबीरपणे उभे आहेत, तो पर्यंत जे कमी पडेल ते आम्ही पुरवणार तसेच नागेश मडकेने हॉटेल देखील सहा दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com