Maratha Empire Map: आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला, शिवप्रेमींचा महामोर्चा

Satara Protest: आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. साताऱ्यामध्ये शिवप्रेमींनी महामोर्चा काढला आहे.

NCERTच्या आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज साताऱ्यात शिवप्रेमींनी भव्य मोर्चाचं आयोजन केलं. सकाळी १० वाजता शिवतीर्थावरून मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती घराण्यातील वृषाली राजे भोसले यांच्या सहभागामुळे या आंदोलनाकडे राज्याचं लक्ष लागलंय. शिक्षण मंत्र्यांच्या सूचनेनंतरही नकाशा न परतल्यानं तीव्र रोष व्यक्त होतोय.

मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्यात आला आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगच्या विरोधात साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्यातील व्यक्तींकडून आज हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. साताऱ्यातील शिवतीर्थावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने शिवप्रेमी,संघटना उपस्थित होत्या. छत्रपती घराण्यातील वृषालीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com