Maratha Reservation : पोलिसांनी आंदोलकांना रोखलं; आंदोलक तापले

Jalna News : परभणीकडून अंतरावलीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना रोखण्यात आलं आहे. त्यामुळे वडीगोद्री फाट्यावर मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत.

जालन्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 8 वा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. अद्यापही सरकारकडून त्यांच्या प्रकृतीची दाखलं घेतली गेलेली नाही. जरांगे यांची प्रकृती बिघडल्यामुळे मराठा आंदोलक अंतरावलीकडे निघाले आहे. मात्र परभणीकडून अंतरावलीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना रोखण्यात आलं आहे. त्यामुळे वडीगोद्री फाट्यावर मराठा आंदोलक आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत.

वडीगोद्रीमधून न जाता पर्यायी मार्गाचा वापर करा, असं पोलिसांकडून सांगण्यात आल्यानंतर आक्रमक मराठा आंदोलकांनी रास्तारोको सुरू केला आहे. गेल्या 2 तासांपासून मराठा आंदोलकांनी हा रस्ता अडवून ठेवल्याने सोलापूर - धुळे महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. पोलिस या आंदोलकांना मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी जाऊ देत नसल्याने संतप्त मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. त्यामुळे या महामार्गावरून 2 तासात एकही वाहन जाऊ शकलेले नाही. परिसरात वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. तर वडीगोद्रीमधून न जाता पर्यायी मार्गाने जा अशी विनंती पोलिसांकडून या आंदोलकांना करण्यात येत आहे. मात्र आंदोलक आपल्या पवित्र्यावर ठाम आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com