Sambhajinagar News : मराठा कार्यकर्ते आक्रमक; VIDEO

Maratha Reservation : फुलंब्री तालुक्यात मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी थेट तहसीलदारांची खुर्ची पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत. मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी थेट तहसीलदारांची खुर्ची पेटवून दिल्याची घटना या ठिकाणी घडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांचा संयम आता सुटत चालला असल्याचे चित्र आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा 8 वा दिवस आहे. पण सरकारने अद्याप त्याची दखल घेतली नाही. म्हणून आता मराठा कार्यकर्त्यांकडून उद्विग्न भावना व्यक्त केल्या जात आहे. या आंदोलकांनी मंगळवारी सकाळी फुलंब्री तहसील कार्यालयात येऊन जोरदार नारेबाजी केली. त्यानंतर तहसीलदारांच्या दालनातून त्यांची खुर्ची बाहेर आणून ती पेट्रोल टाकून पेटवून दिली. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी आंदोलकांनी हे कृत्य केले. तसेच भविष्यात याहून अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com