VIDEO: Manoj Jarange Patil यांची जनजागृती शांतता यात्रा परभणीत दाखल

Manoj Jarange News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती शांतता यात्रा, या रॅलीसाठी मुस्लिम समाज बांधवांची बॅनरबाजी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती शांतता यात्रा सुरु आहे. यादरम्यान जरांगे परभणी शहरात दाखल झाले आहेत. परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. त्यानंतर ते विसावा चौकामध्ये दाखल होतील. त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा एकत्र आला आहे. तिथून मुख्य रॅलीला सुरुवात होईल. ही रॅली पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येईल. विसावा चौकातून रॅलीला सुरुवात होऊन ही रॅली परभणी शहरातून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येणार आहे. त्या ठिकाणी मनोज जरांगे हे भाषण करणार आहेत. या रॅलीसाठी मुस्लिम समाज बांधवांनी सुद्धा बॅनर लावत शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com