Video
Manoj Jarange Patil News | मंगळवारपासून जरांगेंचं अंतरवाली सराटीत उपोषण
चार जूनपासून आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषण करणार आहेत. सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी हे उपोषण असणार आहे.
जालना : चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याच दिवसापासून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत. आंतरवाली सराटीत जरांगे पाटील उपोषण करणार आहेत. मराठा आरक्षणात सगे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी हे उपोषण असणार आहे. गेल्या १० महिन्यातील जरांगे पाटील यांचे हे चौथे उपोषण आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा केली होती. उपोषणाच्या ठिकाणी दररोज रात्री कीर्तन होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील कीर्तनकारही आंतरवाली सराटीत येणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.