Manoj Jarange: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना; पत्नी सुमित्रा म्हणाल्या, ही शेवटची लढाई|VIDEO

Manoj Jarange Wife Sumitra Statement On Maratha Reservation: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना झाले असून त्यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे यांनी सरकारला थेट संदेश दिला आहे. लाडक्या बहिणींना आरक्षण द्या, पैसे नको, असे त्यांनी सांगितले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारला असून आज ते आंतरवलीसराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहे. राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकवटायला सुरुवात झालीय. जरांगे यांचा परिवार देखील या मोर्चात सहभागी झाला आहे. जरांगे पाटील यांची पत्नी सुमित्रा जरांगे व मुलगी पल्लवी जरांगे औक्षण करण्यासाठी अंकुश नगर या ठिकाणी थांबले आहेत. ही शेवटची लढाई आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पाटील घरी येणार नाहीत असं पाटलांनी आम्हाला सांगितलं आहे. सरकार जर लाडक्या बहिणी मानतात लाडक्या बहिणींना आरक्षण द्यावे पैसे देऊ नये. पाटलांची ही लढाई 22 वर्षाची आहे. असे त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com