Manoj Jarange News: लक्ष्मण हाके यांच्या 'त्या' वक्तव्यावरुन जरांगे आक्रमक!

लक्ष्मण हाके यांनी मराठ्यांच्या 54 लाख नोंदी रद्द करण्याच मागणी केली आहे.हाकेंच्या या वक्तव्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.ओबसी आरक्षण हे बोगस आहे,असं मोठं विधान जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधताना केलंय.

Maratha Protest News: लक्ष्मण हाके यांचं गेल्या 9 दिवसांपासून ओबसी आरक्षणाला धक्का लागू नये,यासाठी उपोषण सुरु आहे,दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाने देखील हाकेंची भेट घेतली.यावेळी लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले,ओबीसींना मंडल आयोगाने दिलेलं आरक्षण खोटं आहे. कोणाला पाडा किंवा निवडूण आणा म्हणालो नाही.असं जरांगे म्हणाले. आमच्या नोंदी निघाल्या असून त्या नोंदी रद्द करा असं म्हणत असतील तर, मराठ्यांनी आता तरी शहाणं व्हावं असं आवाहन जरांगेंनी मराठी बांधवांना केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com