Manoj Jarange On Reservation: जरांगेंचं ठरलं! सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ; उपोषण स्थगित करणार?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण सुरु केलं होतं. आज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा 5 वा दिवस आहे. दरम्यान काल रात्री 23 जुलैला मनोज जरांगेंची तब्येत खालावली होती.त्यांना जबरदस्ती सलाईन लावण्यात आली. आणि आज जरांगेंनी उपोषण स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारला पुन्हा एकदा 13 ऑगस्टपर्यंत जरांगेंनी आरक्षणासाठी वेळ दिला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत जरांगेंनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) अप्रत्यक्ष टीका केली. उपोषण स्थगित केल्यानंतर जरांगेंची पुढची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.