Manoj Jarange’s aide Gangadhar Kalkute receives death threat over phone : मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटेंना जिवे मारण्याची धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाला. संतोष देशमुख यांच्यानंतर तुझाच नंबर होता, अशी धमकी गंगाधर काळकुटे यांना देण्यात आली. या ऑडिओ क्लिपची पुष्टी साम टीव्ही करत नाही. तुझ्यात दम असेल तर परळीतील जगमित्र कार्यालयात ये.. धनंजय मुंडेंच्या परळीतील कार्यालयात एकटा ये. आमच्या धनंजय मुंडेंचा जाहीर निषेध करता आणि बदनाम करता म्हणत पैलवान सतीश नामक व्यक्तीने फोन करून गंगाधर काळकुटेंना धमकी दिली.
मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने, 'संतोष देशमुखानंतर तुझाच नंबर होता', असे म्हणत काळकुटे यांना धमकी दिली. धमकी देणाऱ्याने स्वतःची ओळख धनंजय मुंडे यांचा समर्थक असल्याचे सांगितल्याचे ऑडिओ क्लिपमधून दिसतेय. या धमकीची एक ऑडिओ क्लिपदेखील आता समोर आली आहे. गंगाधर काळकुटे यांनी यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार दाखल केली होती. या नव्या धमकी प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.