Malanggad News | मलंगगडाच्या पायथ्याशी घरावर दरड कोसळली

गुलाम सय्यद वय 35 वर्ष हा आपल्या परिवारासोबत अंबरनाथच्या मलंगगड इथे पहिला दर्गा इथे राहत असून त्याच्या सोबत त्याची बायको आणि दीड वर्षाचा मुलगा होता.

Malangad News | गुलाम सय्यद वय 35 वर्ष हा आपल्या परिवारा सोबत अंबरनाथच्या मलंगगड इथे पहिला दर्गा इथे राहत असून त्याच्या सोबत त्याची बायको आणि दीड वर्षाचा मुलगा होता. हे तिन्ही आपल्या घरात झोपलेले असताना सकाळी 7.30 च्या सुमारास डोंगराची दरड गुलाम सय्यद यांच्या घरावर कोसळली. गुलाम याने आपल्या दीड वर्षाचा मुलाला वाचवले असता स्वतःचा जीव गमावावा लागला या मध्ये गुलाम सय्यद याची बायको नाभिया ही देखील गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मलंगगड डोंगराच्या मागच्या बाजूला काही दिवसापूर्वी जेएनपीटी - बडोदा महामार्गचे टनलचे काम चालू असताना तिथे ब्लास्टिंग करण्यात आले होते. यामुळे डोंगरामध्ये कंपन झाले होते आणि त्यामुळेच आज गुलाम सय्यद यांच्या घरावर दरड कोसळून गुलाम यांना आपला जीव गमावावा लागलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com