VIDEO: रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे Malad सबवे पाण्याखाली

Mumbai Rain News: मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस, मालाड सबवे पाण्याखाली, एक दुचाकी आणि एक चार चाकी वाहनं अडकली

मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका मुंबई लोकलला आणि वाहतुकीला बसला आहे. मुंबईतील अनेक सखल भाग हे जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. मालाड पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा मालाड सबवे देखील पाण्याखाली गेला असून सध्या मालाड सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यात एक दुचाकी देखील वाहून गेली असून एक चार चाकी देखील अडकली होती, मात्र स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना बाहेर काढले. मालाड सबवेमध्ये पाच फुटापर्यंत पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com