VIDEO : मंत्रिपदासाठी महायुतीत रस्सीखेच, पुण्यातील आमदारांनी ठोकला मुंबईत तळ
सत्तास्थापनेनंतर महायुतीत संभाव्य मंत्री पदासाठी इच्छुकांची चढाओढ लागली असून त्यासाठी पुण्यातील 12 आमदार आणि विधान परिषदेत 02 आमदारांनी मुंबईत तळ ठोकला आहे. इच्छुक आमदारांनी फडणवीस यांची भेट घेतली असून आता मंत्रीपदांसाठी लॉबिंग सुरू झालं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटकडून दिलीप वळसे पाटील, भाजपकडून चंद्रकांत पाटील यांची नावं निश्चित असली तरी इतरांनाही संधी मिळावी म्हणून हालचाल सुरू झाली आहे. तर भाजपाकडून माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, महेश लांडगे, राहुल कुल यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मातंग समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून आमदार सुनील कांबळे, विधानपरिषद आमदार अमित गोरखे हे सुद्धा प्रयत्न करत आहेत. तिन्ही पक्षांकडून एकेक मंत्रिपद दिलं, तरी किती मंत्रिपद पुण्यात देणार हे अनिश्चित असल्याने नेमकं कुणाला पद मिळणार यावर चढाओढ सुरू आहे. त्यामुळे 18 पैकी 12 आमदार आणि 02 विधान परिषदेतील आमदारांनी मुंबईत मुक्कामी राहून मंत्रिपद मिळावे यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्हामध्ये किती मंत्रिपद येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.