MVA Meeting : जागावाटपाबाबत मविआची बैठक सुरू

Maharashtra Politics : महाविकास आघाडीची बैठक सुरू झाली आहे. मुंबईच्या बीकेसीमधल्या सोफीटेल हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीची बैठक सुरू झाली आहे. मुंबईच्या बीकेसीमधल्या सोफीटेल हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेना तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ही देखील बैठकीला उपस्थित आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडीची जागा वाटप संदर्भातील ही बैठक असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात चर्चा होणार आहे. ज्या जागांवर या दोन्ही गटांनी दावा केला आहे त्या जागांसंदर्भात या बैठकीत निर्णय घेतला जेल अशी शक्यता आहे. ठाकरे गटाकडून या बैठकीला संजय राऊत आणि इतर नेते उपस्थित आहेत. तर शरद पवार यांच्या गटाकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची उपस्थित आहेत. जागांचा तिढा सोडवण्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com