VIDEO : अखेर मविआचा तिढा सुटला? 205 जागांचे वाटप पूर्ण

Maharashtra Politics : मविआचा विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठीचा तिढा सुटलेला दिसत आहे. 205 जागांच्या वाटपावर मविआतील पक्षांचं एकमत झालेलं आहे.

महाविकास आघाडीच्या चर्चेत 205 जागांच वाटप पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 205 जागांमध्ये प्रत्येक पक्षांना सुटणाऱ्य जागांवर काम सुरू असल्याचं देखील समजल आहे. तर उरलेल्या 83 जागांवर दसऱ्यानंतर चर्चा होणार आहे.

विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून जागावाटपाचा तिढा काहीसा सुटलेला दिसत आहे. 288 पैकी 205 जागा या तिन्ही पक्षांमध्ये वाटण्यात आल्या आहेत. ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि कॉंग्रेसमध्ये या 205 जागांवर एकमत झालं आहे. त्यामुळे आता या पक्षांनी आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. उरलेल्या 83 जागांपैकी 2 जागा समाजवादी पक्षाला जाण्याची शक्यता आहे. तर एखादी जागा इतर मित्र पक्षांना जाऊ शकते. यासगळ्या बाबींवर दसऱ्यानंतर चर्चा होणार आहे. मात्र सध्या तरी 205 जागांचा तिढा सुटलेला दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com