Maharashtra Politics: मनसेची विधानसभेसाठी जोरदार तयारी; चौथा उमेदवार केला जाहीर, पाहा VIDEO

MNS Announced Santosh Nagargoje Candidate In Latur Gramin: विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी मनसेच्या चौथ्या उमेदवाराची घोषणा केलीय. लातूर ग्रामीणमध्ये मनसेने संतोष नागरगोजे यांना उमेदवार दिलीय.

मुंबई : राजकीय वर्तुळातून मनसेसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी आता चौथा उमेदवार जाहीर करण्यात आलाय. लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे यांना मनसेनं मैदानात उतरवलं आहे. राज ठाकरे यांनी लातूरमधून उमेदवार जाहीर केलाय. मनसेकडून विधानसभेसाठी संतोष नागरजोगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. लातूरमधून मनसेचा पहिला उमेदवार आज जाहीर झालाय. मनसेच्या शेतकरी सेनेच्या प्रदेश अध्यक्षांना लातूर ग्रामीण विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

लातूरमध्ये संतोष नागरगोजे हे सध्या मनसेचे शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांनी याअगोदर त्यांनी २०१४ मध्ये मनसेकडून लातूर ग्रामीणमधून निवडणूक लढवली होते, आता पुन्हा एकदा संतोष नागरगोजे लातूर ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मिशन महाराष्ट्रवर आहेत. मनसे विधानसभेसाठी कंबूर कसून मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com