Maharashtra Rain News: राज्यातील पावसाची खबरबात! कुठे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार तर कुठे पिकांनाही फटका

Maharashtra Rain Update News Today: विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह नेमकी कुठे कुठे पावसाची जोरदार हजेरी?

बातमी आहे राज्यातील पावसाची. छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. अखेर दुपारनंतर शहरात पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा पसरला होता. तर तिकडे विदर्भात अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातही सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने केळी पिकांचं काही प्रमाणात नुकसान झालं. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आणि कुडाळमध्येही पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा दिलाय. दुसरीकडे पिकांच्या नुकसानीही भीतीही व्यक्त केली जातेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com