Budget Session: तळीरामांचं टेन्शन वाढवणारी बातमी,सार्वजनिक ठिकाणी दारु पिताय,सावधान

New law against public drinking : राज्यात दारू पिऊन अनेकजन हे गैरवर्तन केल्याचे प्रकार दिवसागणिक वाढतांना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार हे कठोर पाऊल उचलणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

राज्यात आता एक नवीन विधेयक येणार आहे, ज्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. पहिल्या अपराधासाठी नऊ महिने सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला जाईल. तर, दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास दीड वर्षांची सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंड होईल. दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तींमुळे सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन, अश्लील चाळे आणि महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यामुळे धार्मिक स्थळांचे पावित्र्यही धोक्यात येत आहे.या समस्येवर आळा घालण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन फिरणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार असून, कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारची करडी नजर राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com