Ritesh Deshmukh: लिहिलेले पुसता येतं, कोरलेलं नाही; रितेश देशमुखांचं रवींद्र चव्हाणांवर टीकास्त्र

Ritesh Deshmukh On Ravindra Chavan: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर येथे स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि लातूरकरांमध्ये तीव्र नाराजी आणि निषेधाची भावना निर्माण झाली आहे. विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अभिनेते रितेश देशमुख यांनीही त्यांच्या सोशल माध्यमातून एक व्हिडीओ पोस्ट करत रवींद्र चव्हाण यांना उत्तर दिलं. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले की, 'दोन्ही हात वर करून सांगतो लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावे मनावर कोरलेले असतात. लिहिलेले पुसता येतं पण कोरलेलं नाही.' रितेश देशमुख यांची ही भावनिक पोस्ट सध्या लातूरमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. आहे रवींद्र चव्हाण यांनी लातूर येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांचा जोश पाहून १०० टक्के लातूर शहरातून विलासरावांचे विचार पुसले जातील असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय वाद उफाळून आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com