Raju Shetty: राजू शेट्टींनी घनसावंगीतून निवडणूक लढवावी, जालन्यामधील पदाधिकाऱ्यांची मागणी

Jalna Swabhimani Shetkari Sanghatana: राजू शेट्टी यांनी घणसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांच्याविरोधात निवडणूक लढवावी, अशी मागणी जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी समोर आली आहे. राजू शेट्टींनी (Raju Shetty) घनसावंगीतून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राजू शेट्टी यांनी घणसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांच्याविरोधात निवडणूक लढवावी, अशी मागणी जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार राजेश टोपे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की 'गेल्या दोन वर्षांपासून कापसाच्या आणि सोयबिनच्या दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर राजू शेट्टी यांनी या विधानसभा मतदारसंघातून राजेश टोपेंविरोधात विधानसभा निवडणूक लढवावी असा सर्वानूमते ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव राजू शेट्टी यांना पाठवणार आहे. '

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com