HEADLINES In Marathi : महाराष्ट्रात गुंतवणूक, राजकारण ते महागाई, बघा २०-२० हेडलाइन्स

News Headlines in Maharashtra : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि गणेशोत्सवात वाढलेल्या वस्तूंच्या किंमती, सर्व महत्वाच्या घडामोडींचा धांडोळा या २०-२० हेडलाइन्समधून...
  • आमदार रवी राणा 'पाना' चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. निवडणूक आयोगाकडून राणा यांना नवं चिन्ह देण्यात आलं आहे.

  • विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांसाठी गडकरी सक्रिय झाल्याचे सांगण्यात येत आहे. नागपूर महापालिकेतील जनसमस्यांचा आढावा घेणार असून, वाढत्या आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं.

  • रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांच्याविषयी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. युतीधर्म पाळला नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

  • नवी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयातल्या फर्निचरसाठी चंद्रपुरातलं सागवान वापरलं जाणार आहे. तब्बल ३ हजार घनफूट सागवान रवाना करण्यात येईल.

  • पुण्यातील वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाडच असल्याचं प्राथमिक तपासात सांगण्यात येत आहे. साथीदाराच्या हत्येचा बदला घेण्यासाठी काटा काढल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

  • अखेर पुण्यात बंद असणाऱ्या 1 हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. साम टीव्हीच्या बातमीनंतर महापालिकेला खडबडून जाग आली.

  • जालन्यातील परतूर विधानसभेच्या जागेवरुन महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परतूरच्या जागेवर शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी दावा केला आहे.

  • राज्यात मोठी गुंतवणूक येणार आहे. १ लाख १७ हजार २२० कोटींच्या चार प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. मराठवाडा, विदर्भात 30 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहे.

  • निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरने एम्समध्ये वैद्यकीय तपासणीला तयारी दाखवली आहे. बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आरोपावरून पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयाला विनंती केली आहे.

  • गणेशोत्सवात चुरमुरे, शेंगदाणा आणि डाळींचे दर वाढले आहेत. आता बाप्पाच्या प्रसादासाठी 10 ते 20 टक्के अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

  • महायुतीतील मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी निशाणा साधला आहे. 'शिंदेंच्या नावानं भाजप मतं मागणार असून भाजपकडे आता चेहरा उरला नाही, अशा शब्दांत वडेट्टीवारांनी भाजपवर टीका केली आहे.

  • अमित शाह 8 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. शाह लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. तसंच विधानसभेच्या पार्श्वभूमीवरही आढावा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

  • म्हाडाच्या 2 हजार 30 घरांसाठी 8 ऑक्टोबरला सोडत काढण्यात येणार आहे. लॉटरीची मुदत वाढवल्यानंतर आता सोडतीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सोडत निघणार आहे.

  • कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये आता कंत्राटी शिक्षक भरती होणार आहे. पात्रताधारक संतापले असून, त्यांनी कोर्टात जाण्याची तयारी दाखवली आहे.

  • पश्चिम रेल्वेच्या बोरीवली ते विरार, पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेला हायकोर्टाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. कामात अडथळा ठरणारी 2 हजार 612 कांदळवनं तोडण्याची परवानगीही देण्यात आली आहे.

  • सहा वर्षांनंतर राज्यातली मोठी धरणं यंदा 100 टक्के भरली. उजनी, कोयना, जायकवाडी, वैतरणा धरणांचा साठा पूर्ण क्षमतेनं भरला आहे. त्यामुळं पाण्याची चिंता मिटली आहे.

  • पुण्यात भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे. खडकवासलातून विसर्ग वाढवल्यानं नदीपात्रातला रस्ता बंद करण्यात आला आहे. गणेशोत्सवासाठी खरेदीला येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

  • नाशिकमध्ये गोदावरीची पाणीपातळी वाढल्यानं पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी गेलं होतं. गोदा घाटावरच्या मंदिरांनाही पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता.

  • हिंगोली जिल्ह्यात पुरामुळे हळदीचं मोठं नुकसान झालं आहे. सेनगाव, वसमतसह हिंगोली तालुक्यात हजारो हेक्टरवरच्या शेतातील हळदीची रोपं वाहून गेली.

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाच्या तडाख्यामुळे भाज्यांचे दर कडाडले. कोथिंबीरची जुडी 60 रुपये तर, मेथी 20 रुपये आणि लसणाचे दर 400 रुपये प्रति किलोवर पोहोचले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com