पालघरमध्ये नाट्यगृह, १८ कोटींची पाणी योजना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा|VIDEO

Eknath Shinde Development Plans For Palghar: पालघर जिल्ह्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये पालघरमध्ये नाट्यगृह, गणेश कुंड सुशोभीकरण आणि १८ कोटी रुपयांची पाणी योजना यांचा समावेश आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्ह्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये पालघरमध्ये ठाण्याच्या धर्तीवर नाट्यगृह उभारणे, गणेश कुंडाचे सुशोभीकरण करणे आणि १८ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करणे यांचा समावेश आहे. राज्यातील देवस्थाने, तीर्थक्षेत्रे आणि गड-किल्ल्यांच्या पुनर्बांधणीला प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जे बोलतो ते करतो. प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणत नाही. आपण जो शब्द दिला तो शब्द पाळतो. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कामाच्या पद्धतीवर भर दिला. त्यांनी पालघरकरांना दररोज स्वच्छ पाणीपुरवठा देणार ही जबाबदारी सरकारची असल्याचे सांगितले. भाषणात त्यांनी यशस्वी ठरलेल्या 'लाडकी बहीण' योजनेचाही उल्लेख केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com