Maharashtra Politics: विजय वडेट्टीवार यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक टोला

Vijay Wadettiwar on Ajit Pawar News Today: राज्यमंत्रिपद मिळालं तरी खूप, विजय वडेट्टीवारांचं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा

काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर संपली आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. कुणालाही मान सन्मान हा त्यांच्या संख्याबळावरच मिळत असतो, असं त्यांनी म्हटलं. दरम्यान, ज्या दोन बाबूंच्या सोबत मोदींनी सत्ता स्थानप केली, त्यांची तिथे काय हालत होणार, हेही लवकरच कळेल, असं म्हणत वडेट्टीवारांनी सूचक इशाराही दिलाय. अजित पवारांच्या पक्षाला राज्यमंत्री मिळालं, तरी खूप आहे, असं खोचक विधान वडेट्टीवार यांनी केलंय. केंद्रात सरकार आलं नसतं, तर अजित पवार बाहेर पडले असते, असंही विधान विजय वडेट्टीवारांनी केलंय. सत्तेमध्ये जाऊन आपली प्रकरण बंद होत असतील, तर त्यासाठी अजित पवारांनी सगळी आयडीया केली की काय? अशी शंकाही वडेट्टीवारांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com