Chhatrapati Sambhajinagar : सत्कारावरून रंगलं नाराजीनाट्य; संदिपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वाद, पाहा VIDEO

Sandipan Bhumre Vs Chandrakant Khaire In Ganeshotsav : छत्रपती संभाजीनगरमध्ये आजी-माजी खासदार यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचं पाहायला मिळालं. मानापमानावरून मोठं नाराजीनाट्य संदिपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात झालंय.

मुंबई : छत्रपती संभाजीनगरचे ग्राम दैवत संस्थान गणपती प्रतिष्ठापना वेळी चंद्रकांत खैरे आणि खासदार संदीपान भूमरे यांच्यात नाराजीनाट्य पाहायला मिळालं. सत्कार आणि प्रोटोकॉलकरून व्यासपीठावर शाब्दिक चकमक झालीय. संस्थान गणपतीची आरती झाल्यानंतर शहरातील नेते एकत्र आले होते. त्यावेळी सत्कार सुरू झाला. त्यावेळी कुणाचा सत्कार अगोदर? यावरून हमरीतुमरी झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये येथे संस्थान गणपतीच्या आरती वेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आजी खासदार संदीपान भुमरे यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली.

मोठे मानापमान नाट्य छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालं. माझ्य आधी चंद्रकांत खैरे यांचा सत्कार कसा? तो कोण, असा सवाल भुमरे यांनी आयोजकांना केला. त्यावेळी खैरे यांनी भुमरेंकडे लक्ष देऊ नका, असं सांगितलं. यामुळे वातावरण चांगलाच तापलं होतं. अखेर उपस्थित भागवत कराड आणि अतुल सावे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मात्र गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना उद्धव गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद पाहायला मिळाला. यावेळी सर्वच नेत्यांनी एकमेकांवर चांगली टोलेबाजी सुद्धा केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com