राज्याच्या राजकारणात आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत एकंदरीतच मोठा भूकंप होणार असल्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे शरद पवार यांच्या काही खासदारांना संपर्क करत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. यावर आता अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार हे शरद पवार यांच्या पक्षात मोठी फुट पडणार आणि राजकीय भूकंप आणणार असल्याचं सांगितलं जात असतानाच प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे की, मिडियामध्ये या बाबत जोरदार चर्चा सुरू आहे. आम्ही देखील याबद्दल प्रांतअध्यक्षांसोबत याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर त्यांनी स्वत: सांगितलं आहे की तुम्हाला काही माहीत नसल्याने कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. काही वेळातच सुनील तटकरे हे स्वत: माध्यमांसमोर येऊन आव्हाड यांनी केलेल्या आरोपात किती तथ्य आहे, किती नाही हे सांगतील, असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.