Ladka Bhau Yojana: लाडका भाऊ योजना फेल; राज्यातील तरुणांवर बेरोजगारीची टांगती तलवार|VIDEO

Failure Of Ladka Bhau Scheme In Maharashtra: लाडका भाऊ योजनेच्या अपयशामुळे राज्यभरातील तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली ५० हजार तरुणांनी छत्री आंदोलनात भाग घेत "हातांना काम द्या" अशी मागणी केली आहे.

नंदुरबार : राज्य सरकारची गाजलेली मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सध्या अपयशाच्या छायेत सापडली आहे. लाडका भाऊ म्हणून ओळखले जाणारे एक लाखाहून अधिक प्रशिक्षणार्थी सध्या बेरोजगारीच्या कचाट्यात अडकले आहेत. योजनेतून रोजगार मिळण्याची आशा असलेल्या युवकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या योजनेतील अन्यायकारक अंमलबजावणी विरोधात व आपल्या मागण्यांसाठी राज्यभरातील युवकांनी एकत्र येत छत्री आंदोलन सुरू केलं आहे. सांगलीचे तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वात सुमारे ५० हजारांहून अधिक युवकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. या आंदोलनातून “बेरोजगार तरुणांच्या हातांना काम द्या” असा जोरदार नारा दिला जात आहे.

या पार्श्वभूमीवर तुकाराम बाबा महाराजांनी 'साम टीव्ही'शी संवाद साधताना सरकारवर ताशेरे ओढले. राज्य सरकारने आमच्या भावनांशी खेळू नये. योजनेचे नाव लाडका भाऊ असले तरी आम्ही सरकारसाठी नुसते आकडे नाही. आम्हाला हक्काचा रोजगार हवा आहे, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. सध्या नंदुरबार, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यांतून या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळत असून, लवकरच मुख्यमंत्री कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com