Rashi Shukla : शुक्लांना हटवलं, महायुतीला झटका? रश्मी शुक्लांची कारकीर्द वादग्रस्त का ठरली? वाचा

Rashi Shukla News : महाविकास आघाडीच्या मागणीनंतर वादग्रस्त ठरलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना केंद्रीय निवडणूक आयोगाने हटवलंय. मात्र रश्मी शुक्लांची कारकीर्द कशी होती? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

गणेश मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी वादात सापडलेल्या रश्मी शुक्लांना पोलिस महासंचालक पदावरून हटवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलाय. काँग्रेसने वारंवार रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी केली होती. आता रश्मी शुक्लांना हटवल्याने हा महायुतीला मोठा धक्का मानला जातोय.. तर शरद पवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत केलंय.. तर असं अधिका-याला टार्गेट करणं भविष्यात काँग्रेसलाही महागात पडू शकतं असा इशारा भाजपनं दिलाय.

निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालकपदावरून हटवण्याचा निर्णय घेतलेल्या रश्मी शुक्लांची कारकीर्द कशी वादग्रस्त ठरलीय ते पाहूयात...

रश्मी शुक्लांची वादग्रस्त कारकीर्द

पुण्याच्या पोलीस आयुक्त आणि गुप्तवार्ता विभागात काम

फडणवीसांच्या सांगण्यावरून शुक्लांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप

फोन टॅपिंग प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल

जानेवारी 2024 मध्ये पोलिस महासंचालकपदावर नियुक्ती

जून 2024 मध्ये संपणारा शुक्लांचा कार्यकाल महायुतीने 2026 पर्यंत वाढवला

विरोधी पक्षातील नेत्यांना धमकावल्याचा मविआचा आरोप

रश्मी शुक्लांना हटवण्याचे आयोगानं आदेश दिल्यामुळे त्यांना मुदतवाढ देणा-या महायुतीला सरकारलही झटका बसलाय. तर नव्या पोलिस महासंचालकांची नियुक्ती 5 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. मात्र रश्मी शुक्लांना निवडणूक होईपर्यंत कोणत्याही पदावर नियुक्ती देऊ नये, अशी मागणी काँग्रेसने केलीय. त्यामुळे आता निवडणूक आयोग काँग्रेसची ही मागणीही मान्य करणार का? याकडे लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com