Pune: पुण्यात पुन्हा दहशतवादी? 'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर झळकले; ATS कडून १९ ठिकाणी छापेमारी

Pune ATS Action: पुण्यामध्ये एटीएसने मोठी कारवाई केली आहे. १९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहेत. यावेळी 'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर झळकवण्यात आले.

पुणे शहरात एटीएस आणि पुणे पोलीसांनी मोठी कारवाई केली. एटीएसकडून १९ जणांच्या घरी छापेमारी केली. एटीएसने कोंढवा, खडक, खडकी, वानवडी, भोसरी या परिसरात १९ संशयित व्यक्तींच्या घर आणि कार्यालय येथे सर्च व चौकशी सुरू आहे. कोंढव्यात एटीएसने गुरुवारी सकाळी छापे टाकले. मीठानगर भागातील संशयितांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. एटीएसच्या पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा भागात मध्यरात्रीपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. तब्बल १९ ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. एटीएस आणि पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. या करवाईने राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे.

२ वर्षांपूर्वीच पुणे पोलिसांनी बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या ३ जणांना पकडले होते. त्यानंतर देशातील संभाव्य कट उधळला होता. ते दहशतवादी देखील कोंढाव्यात वास्तव्याला होते. त्यानंतर आता आणखी काही संशयित तपास यंत्रणेच्या नजरेत आले आहेत. त्यामुळेच पुणे केंद्र बनले असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com