Assembly Election : महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला काय? CM एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, पाहा VIDEO

CM Eknath Shinde Reaction On MVA Seat Sharing : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला सांगितला आहे. ते नेमकं काय म्हणाले, हे आपण जाणून घेवू या.

मुंबई : महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला काय? हा प्रश्न सर्वांना पडतोय. यावर आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं आहे. आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला आहे. स्ट्राईक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तर विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होवू शकते, अशी माहिती अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलीय.

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीतील स्ट्राइक रेट आणि निवडून येण्याची क्षमता हे निकष विचारात घेतले जाणार आहेत. उमेदवाराची निवड करताना तिन्ही पक्षांच्या सर्व्हेक्षणाचा देखील विचार केला जाईल. लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त भाजपच्या सर्व्हेक्षणाच्या आधारावरच जागावाटप झालं होतं. त्याचा फटका बसलेला दिसल्या. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पक्षाचा स्ट्राइक रेट चांगला होता, त्यालाच जास्त जागा मिळतील असं दिसतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com