Fast News : राजकीय ते शेतीविषयक महत्वाच्या बातम्या, पाहा 20-20 हेडलाइन्स

Saam TV 20- 20 Headlines : देशभरातील तसेच महाराष्ट्रातील राजकीय ते शेतीविषयक बातम्यांचा आढावा २०-२० हेडलाइन्समधून. पाहा व्हिडिओ.
  • मिंधे सरकार हे निवडणुकांपासून फार दूर पळत चाललं आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केली. निवडणूक जवळ येईल तशी भाजपमध्ये अधिक गळती होईल, असं भाकितही राऊत यांनी व्यक्त केली.

  • पुण्यात रासपच्या महादेव जानकरांना काँग्रेसनं जोरदार झटका दिला आहे. पक्षाचे युवक अध्यक्ष उमेश कोकरेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कोकरेंवर खडकवासला विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे.

  • सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय सावंत यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला आहे.

  • ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना सांगली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राहुल गांधींना काळे झेंडे दाखवणार होते. तसेच कायदा-सुव्यवस्थेबाबतही नोटीस बजावली

  • गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल होण्यास सुरुवात. कोकण रेल्वे मार्गावर 310 विशेष गाड्या, ट्रेनला मोठी गर्दी. प्रवाशांच्या सोयीसाठी यात्री सहाय्यक तैनात करण्यात येणार.

  • महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची अडवणूक केल्यास कारवाई होणार असल्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे.

  • मुंबईच्या बीकेसीत बॅटरीवरील स्वयंचलित पॉड टॅक्सी सुरू होणार आहे. लंडनमधील तंत्रज्ञान मुंबईकरांना आता अनुभवता येणार आहे. यामुळे काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

  • पालघरमध्ये काल बुजवलेला खड्डा ठेकेदारानेच स्वत: आज पुन्हा उखडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ऑनलाईन टेंडर न मिळाल्यानं ठेकेदार चिडला होता.

  • नाशिकच्या क्राईम ब्रँचनं दबंग कामगिरी केली आहे. हायप्रोफाइल सोसायटीतील कुंटणखान्याचा भंडाफोड केला आहे. राजकीय वरदहस्ताने कुंटणखाना सुरू करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

  • नाफेडकडून देशांतर्गत बाजारपेठेत कांदा विक्रीसाठी निविदा. नाफेडनं बफर स्टॉक बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू केल्यानं जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा दरात घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

  • बीडच्या माजलगावात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, उडीद पिकांचं मोठं नुकसान झालंय. तातडीनं मदत द्या नाहीतर कृषीमंत्र्यांची गाडी अडवू, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.

  • गुजरातमध्ये मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला. आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू झाला आहे. ३७ हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे.

  • विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शक्तिपीठ प्रकल्प गुंडाळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

  • नागपुरात 100 एकर जागेत फिल्म सिटी उभारली जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. चित्रपट आणि मालिकांसाठी फिल्म सिटीचा वापर होणार आहे.

  • हंगामात खानदेशातील केळीचे दर विक्रमी स्थितीत पोहोचले आहेत. केळीची आवक स्थिर असून, थेट किंवा शिवार खरेदीत कमाल दर प्रतिक्विंटल 3 हजार 100 रुपये मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com