VIDEO: लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक एनडीएने आमच्यावर लादली, Sanjay Raut यांचा गंभीर आरोप

Sanjay Raut News: लोकसभेच्या अध्यक्षाची निवडणूक एनडीएने आमच्यावर लादली, संजय राऊतांचा आरोप

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यादरम्यान लोकसभेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक एनडीएने आमच्यावर लादली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. लोकसभेत एकाच वेळी ७५-८० खासदारांना निलंबित केलेल्या ओम बिर्ला यांना नरेंद्र मोदींनी पदावर बसवलंय, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी मोदींवर केली आहे. लोकसभा अध्यक्ष पदासाठी सर्वात ज्येष्ठ असलेल्या के सुरेश यांना डावललं, आणि कमी वेळा खासदार असलेल्या व्यक्तीला अध्यक्ष पदासाठी निवड केली. राहुल गांधी यांना नमस्कार करूनच मोदींना आता पुढे जावं लागणार आहे. मोदींना सभागृहातून पळ काढता येणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींवर जहरी टीका केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com