VIDEO: Manoj Jarange यांच्या अल्टिमेटमवर, Laxman Hake यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Laxman Hake on Manoj Jarange Ultimatum News: मनोज जरांगे यांची सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी, अध्यादेश काढला तर... लक्ष्मण हाके यांनी सरकारला दिला इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. यावर आज वाट पाहणार, त्यानंतर भूमिका घेणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे. यावर लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढला तर मुंबई जाम करण्याचा इशारा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. एकीकडे जरांगे यांनी दिलेल्या शब्दानुसार मुख्यमंत्र्यांना अध्यादेश काढण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे अध्यादेश काढला तर हाकेंनी मुंबई जाम करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकार आता मोठ्या पेचात सापडलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com