'महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत; CM फडणवीसांचं झ्युरिचमध्ये ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या उद्घाटनप्रसंगी वक्तव्य

Global Impact Forum Inaugurated in Zurich : महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत असल्याची खात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झ्युरिच येथे ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या उद्घाटनप्रसंगी दिली.

महाराष्ट्रातील उद्योजकीय कौशल्य जागतिक दर्जा आणि स्पर्धेत अग्रेसर राहावं, या उद्देश्याने स्थापन करण्यात आलेल्या ग्लोबल इम्पॅक्ट फोरमचं उद्घाटन 18 जानेवारीला स्वित्झर्लंडमधल्या झ्युरिच इथं झालं. एपी ग्लोबल आणि सकाळ माध्यम समूहाने या फोरमची स्थापना केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वित्झर्लंडचे खासदार आणि स्विस-भारत संसदीय मैत्री समूहाचे अध्यक्ष डॉ. एस. सी. निक गगर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला.

स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं 20 जानेवारीपासून जागतिक आर्थिक परिषदेला सुरूवात होणार आहे. भारतात आणि महाराष्ट्रात होणाऱ्या गुंतवणुकीचे विविध प्रस्ताव यानिमित्ताने सादर होणार असून परिषदेसाठी जगभरातील उद्योगपती, वित्तसंस्था आणि प्रभावशाली व्यक्ती दावोसमध्ये उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com