नाले स्वच्छ केलं की कचरा काढला, पाच वर्षात काय केलं; भाजपच्या माजी नगरसेवकाला नागरिकांनी घेरलं|VIDEO

Citizens protest Against BJP Ex Corporator In Latur: लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजपच्या माजी नगरसेविकेला नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले.

लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजपच्या माजी नगरसेविकेला नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. प्रचारासाठी आलेल्या माजी नगरसेविकेला महिला मतदारांनी थेट सवाल करत अक्षरशः धारेवर धरले.

पाच वर्षांच्या काळात नाले स्वच्छता, कचरा उचलणे यासारखी मूलभूत कामेही झाली नाहीत. मग आता मतं मागण्यासाठी कशासाठी येता? असा थेट प्रश्न संतप्त महिला मतदारांनी उपस्थित केला. सहा महिन्यांतून एकदाही परिसरातील समस्या जाणून घेण्यासाठी न आल्याचा आरोप करत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला.

प्रभागातील अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या नाल्या आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रचारादरम्यानच हा रोष उफाळून आल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा प्रकार अडचणीचा ठरत असल्याचे बोलले जात आहे. येत्या निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com