Latur Bank Election: अपहरणाच्या आरोपांनंतर काँग्रेसची सावध भूमिका, मतदारांना बसने थेट मतदान केंद्रावर आणले

Latur District Bank Election: लातूर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यावेळी काँग्रेसने सावध भूमिका घेतली. मतदारांना थेट बसने मतदान केंद्रापर्यंत आणले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीदरम्यान मतदारांना पळवून नेल्याच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच काँग्रेसने सावध भूमिका घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मतदानाच्या दिवशी आपल्या समर्थक मतदारांना एकत्रित ठेवण्यासाठी काँग्रेसकडून विशेष नियोजन करण्यात आले. मतदारांना एकत्र आणत थेट बसमधून मतदान केंद्रापर्यंत नेण्यात आले.

मतदान केंद्रापर्यंत मतदारांना सुरक्षितपणे पोहोचवण्यावर काँग्रेस नेत्यांनी भर दिल्याचे दिसून आले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच राजकीय प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज, माघारी, मतदारांवर दबाव आणल्याचे आरोप आणि मतदारांना पळवून नेल्याच्या तक्रारींमुळे निवडणूक चर्चेत आली. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी काँग्रेसने मतदारांना एकत्रित ठेवत आपली संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.