Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेण्याबाबत आदिती तटकरेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या... | VIDEO

Aditi Tatkare Statement : लाडकी बहिण योजनेत अपात्र ठरणाऱ्या आणि निकषांत न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करून पैसे परत घेतले जाणार असल्याच्या नियमावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केलं आहे.

अपात्र ठरण्याची टांगती तलवार आणि मिळालेले पैसे परत करावे लागण्याच्या भीतीमुळे लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांनी माघार घेतली आहे. त्यामुळे पडताळणीपूर्वीच चार हजार बहिणींनी माघार घेतली आहे. यावर आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'डिसेंबरमध्ये काहींनी पैसे दिले. काहींनी या महिन्यातही द्यायला सुरुवात केली आहे. त्या प्रामाणिक आहेत हे या उदाहरणातून पाहायला मिळत आहे. मी लाडक्या बहिणींचे आभार मानेल, असं त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

पुढे बोलताना तटकरे म्हणाल्या की, आत्तापर्यंत अंदाजे चार हजार महिलांनी अर्ज मागे घेतला. तो आकडा अधिक असून शकतो. ही प्रोसेस सतत सुरू राहणार आहे. जसे जसे अर्ज येतील तशी आम्ही प्रक्रिया करू. त्यामुळे अर्ज मागे घेण्याचा आकडा कमी जास्त होईल. या महिलांकडून परत आलेला निधी सरकारी तिजोरीत जाणार आहे. तसंच हा पैसा लोकोपयोगी आणि लोककल्याणकारी योजनेत वापरला जाईल, अशीही घोषणा यावेळी आदिती तटकरे यांनी केली आहे. त्यामुळे दिलेले पैसे जबरदस्तीने घेतले जाणार नसल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र निकषात न बसणाऱ्या महिलांनी पैसे परत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com