Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना संक्रातीआधी मिळणार ३ हजार रुपये? VIDEO

Mahayuti Government News : नवीन वर्ष आणि संक्रांतीसाठी फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात 3 हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न असताना आता फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं मोठं गिफ्ट देणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिवाळी भाऊबीज म्हणून महायुती सरकारने नोव्हेंबरचा हप्ता आधीच दिला होता. आता संक्रांतीसाठी देखील फडणवीस सरकार डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींना एकत्र देणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्रित 3 हजार रुपये जमा होणार आहे. तर पावणेतीन कोटी अर्जाच्या फेरतपासणीचा निर्णय लांबणीवर पडणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता लाभार्थी बहिणींना 3 हजार रुपये लवकरच मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com