Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना खुशखबर! मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली डिसेंबरच्या हप्त्याची तारीख|VIDEO

CM Devendra Fadnavis News : राज्यातल्या लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं असताना आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबद्दल मोठं विधान केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल भाष्य केलं आहे. अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होतील असं फडणवीस यांनी म्हंटलं आहे. त्याचबरोबर राज्यातील एकही योजना बंद पडू देणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

लाडकी बहीण योजनेचे या आधीचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आत्तापर्यंत एकही हप्ता महिलाना मिळालेला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा या योजनेचा हप्ता कधी मिळणार याबद्दल प्रश्न उपस्थित होत होते. मात्र आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार या प्रश्नाला पूर्णविराम लागला आहे. अधिवेशन संपल्यावर सर्व महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com