Koyta Gang News : पुण्याच्या कोयता गॅंगला कुणाचं आहे अभय?

Pune News : हडपसरमध्ये या गॅंगने कोयत्याने तोडफोड, परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. या गॅंगवर पोलिस कधी कारवाई करणार असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जात आहे.

पुण्यात कोयता गॅंगचं धाडस दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. हडपसरमध्ये या गॅंगने कोयत्याने तोडफोड, परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे.

पुण्यातील कोयता गॅंगला कायद्याचा धाक उरलेला नसल्याचं काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. गुरुवारी रात्री हडपसरमधील साडे सतरा नळी येथे या टोळक्याने कुटुंबाला शिवीगाळ करत कोयत्याने वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली. इतकेच नाही तर हवेत कोयते फिरवून एका घरावर दगडफेकही केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले. याप्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांना बापू मकवाना आणि प्रसाद ढगे यांनी मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्या साथीदारांनी परिसरात मोठ-मोठ्याने शिवीगाळ करत दहशत पसरवली. तक्रारदारांना शिवीगाळ केली. नंतर टेम्पोच्या काचा फोडत हातातील कोयते हवेत फिरवून दहशत माजवली. हातात कोयते घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या या गॅंगवर पोलिस कधी कारवाई करणार असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com