Konkan High Tides : कोकण किनारपट्टीला तडाखा देणाऱ्या अजस्त्र लाटा बघून धडकी भरेल | VIDEO

Konkan High Tides News : जून महिन्यातली सर्वात मोठी भरती असल्यामुळे कोकण किनारपट्टी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टीला अजस्त्र लाटांचा जोरदार तडाखा बसला आहे. समुद्रात उंचच्या उंच लाटा उसळत आहेत. आज जून महिन्यातली सर्वात मोठी भरती असल्याने समुद्र अधिकच खवळलेला आहे. साडेतीन ते चार मीटर पेक्षा उंच लाटा समुद्रात उसळताना दिसत आहेत. यासोबतच किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, किनारपट्टी भागातील नागरिकांना आणि पर्यटकांना समुद्राच्या ठिकाणी जावू नये असे अहवान करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसाय करणाऱ्या मासेमाऱ्यांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही तास किनारपट्टी भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com