VIDEO: Bhimashankar मधील कोंढवळ धबधबा प्रवाहित, मात्र पर्यटकांना पर्यटनास बंदी

Sahyadri,Bhimashankar Rain News: सह्याद्रीच्या कुशीत संततधार पावसाची हजेरी, पावसामुळे सह्याद्रीतील धबधबे प्रवाहीत, भीमाशंकर अभयारण्यात पर्यटकांना बंदी

सह्याद्रीच्या कुशीत संततधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सह्याद्रीचा परिसर खुलुन निघाला आहे. पावसामुळे सह्याद्रीतले धबधबे प्रवाहित झाले आहेत. भीमाशंकर अभयारण्यातील कोंढवळ धबधबाही प्रवाहीत झाला आहे. भीमाशंकर येथे ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा शुकशुकाट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच पर्यटक वाहून गेल्याच्या घटना या परिसरात घडल्या होत्या. पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्यास जीवघेणा अपघात होऊ शकतात त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने भीमाशंकर अभायारण्यातील पर्यटनाला बंदी घातली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com