Vishalgad Fort: विशाळगडावर मोठा पोलीस बंदोबस्त, कारण काय?VIDEO

No Uroos or Festivities Allowed on Vishalgad: विशाळगडावरील उरुसाला परवानगी नाकारली असून कोणत्याही पद्धतीने उरुस आणि सन गडावर साजरा करता येणार नाही. अशी माहिती कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली आहे.

कोल्हापूर: विशाळगडावर ईद आणि ऊरुस साजरा केल्यास उधळून लावू असा इशारा काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनेने दिला होता. बकरी ईदच्या निमिताने मुंबई हायकोर्टाने विशाळगडावर कुर्बानी देण्यास परवानगी दिली होती. यानंतर हिंदू संघटनेने यावर आक्षेप घेत कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते.

यावरच आज कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक यांनी माहिती दिली आहे. गडावर उरूसला परवानगी नाकारली असून कोणत्याही पद्धतीने उरूस, आणि कुठलाही सन गडावर करता येणार नाही.अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशाळगड येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर ही शाहू नगरी आहे. त्यामुळे जिल्ह्याला गालबोट लागणार नाही या दृष्टीने सर्वच समाजाने काळजी घ्यावी असं आवाहन देखील कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com