VIDEO: राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

Rahul Gandhi Inaugurate Statue Of Shivaji Maharaj: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज कोल्हापूरच्या कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी कोल्हापुरमधील कसबा बावडा याठिकाणी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा बहुशस्त्रधारी भव्य पुतळा साकारण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेसच्या नेत्यांनील हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान कोल्हापुरकरांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर राहुल गांधी शाहू समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन करण्यासाठी रवाना झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com