उन्हाळा आला की सर्वांना चाहूल लागते ती थंड पेय पिण्याची. अनेकजण लस्सीच्या गाड्यांवर जाऊन आनंदाने लस्सी पिताना दिसतात.मात्र कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शवविच्छेदनात वापरलेला बर्फ धुवून पाणी थंड करण्यासाठी आणि लस्सी गार करण्यासाठी वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे.
हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि संबंधित लस्सी विक्रेत्याला चांगलाच हाणला आहे. शवविच्छेदनासाठी वापरलेला बर्फ गटारीत टाकण्यात आला होता. मात्र हा बर्फ परत उचलून स्वच्छ धुतल्याचा दिखावा करून लस्सी थंड करण्यासाठी वापरण्यात येत होता. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.