Panchganga River: कोल्हापुरात पुन्हा मुसळधार पाऊस; शिंगणापूर बंधारा पाण्याखाली|VIDEO

Kolhapur on Alert After: तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शिंगणापूर बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेला असून या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचगंगा नदीची पातळी आता १८ फूटांवरून वाहत असून त्यामुळे जिल्ह्यातील ७ बंधारे जलमय झाले आहेत.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नदीकिनारी वसलेल्या गावांमध्ये आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाचा जोर असाच राहिल्यास काही ठिकाणी पूरसदृश स्थिती उद्भवू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पंचगंगा नदीतील वाढती पातळी आणि बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे शेती व दळणवळणावर परिणाम होण्याची चिन्हं दिसत आहेत. प्रशासनाकडून पूरनियंत्रण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com