1881 चं कोल्हापूर गॅझेट आरक्षणाच्या लढाईत चर्चेत
गॅझेटनुसार मराठा समाज कुणबी समाजातून उदयास आले
हैदराबाद आणि सातारा गॅझेटनंतर कोल्हापूर गॅझेटलाही महत्त्व
गॅझेटमध्ये छेडछाड झाल्याचे आरोप, वाद वाढला
मराठा आरक्षणाच्या प्रश्नी हैदराबाद आणि सातारा गॅझेटची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असतानाच, आता कोल्हापूर गॅझेटने देखील यात एन्ट्री केली आहे. कोल्हापूर गॅझेटियरमध्ये मराठा आणि कुणबी समाजाच्या ऐतिहासिक उल्लेखामुळे सध्या आरक्षणाच्या चर्चेत या कोल्हापूर गॅझेटला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र या गॅझेट मध्ये छेडछाड केल्याचा आरोप देखील मराठा समाजातील नेत्यांनी केलेला आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनात हैदराबाद आणि सातारा गॅझेटला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. या पाठोपाठ आता कोल्हापूर गॅझेटचे देखील या आरक्षणाच्या लढाईत एंट्री घेतलेली आहे.
1881साली ब्रिटिशांनी लिहिलेल्या कोल्हापूर गॅझेट मध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास, भौगोलिक रचना, लोकजीवन, समाजव्यवस्था आणि परंपरा यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे ब्रिटिश काळापासून कोल्हापूर गॅझेट हे अधिकृत दस्तऐवज मानले जात आहे. मराठा आणि कुणबी समाजाच्या उत्पत्ती व जीवनशैलीबाबत कोल्हापूर गॅझेटमध्ये स्पष्ट उल्लेख आढळतो. कुणबी समाज हा महाराष्ट्रातील प्राचीन शेतकरी समाज आहे. जमीन कसणे, धान्य उत्पादन करणे ही त्यांची मुख्य ओळख दिलेली आहे. तर मराठा समाजाचा उल्लेख योद्धा, पराक्रमी आणि लढाऊ परंपरा असणारा समाज असा करण्यात आला आहे. पण त्याचबरोबर गॅझेटियरमध्ये मराठे हे मूळत: कृषीप्रधान कुणबी समाजातूनच उदयास आले असेही संदर्भ आहेत. याचा अर्थ सामाजिक व ऐतिहासिक स्तरावर मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे या गॅझेटमध्ये नमूद केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.