गणेशोत्सवात लेझर लाईटच्या वापरावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.
ही बंदी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान लागू असेल.
लेझरमुळे भाविकांच्या डोळ्यांना झालेल्या इजेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
नियम तोडल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई होणार आहे.
कोल्हापूर: गणेशोत्सवाच्या दरम्यान आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत लेझर विद्युत रोषणाईचा उपयोग केला जातो. मात्र यातील लेझर अत्यंत घातक आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारींनी गणेशोत्सवाच्या काळात 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान लेझरवर बंदी घातली आहे. त्या संदर्भातील आदेश काल जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जारी करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकीचे आयोजन केले जाते. त्यामध्ये मंडळांकडून लेझरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. गतवर्षी आगमन मिरवणुकीत भाविकांच्या डोळ्यांवर असे लेझर पडल्याने डोळ्यांचा पडदा बुबुळाला इजा झाली होती. त्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे .
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.