Video: धक्कादायक प्रकार; एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीवर चाकूहल्ला!

Amravati News: अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीवर चाकूहल्ला केला आहे. ही घटना अमरावतीच्या राजापेठ परिसरात घडल्याची माहिती समोर येत आहे.

अमरावतीच्या (Amravati) राजापेठमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन तरुणीवर एका तरुणाने चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे. चाकूहल्ल्यात मुलीच्या गळ्यावर 6 टाके पडले असून, सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्लोखोर मुलगा पळून जात असताना उपस्थित नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला आहे. तो तरुण वारंवार त्या तरुणीचा पाठलाग करत होता. याआधी त्या तरुणावर गुन्हा दाखल केला होता. या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र एकत्र खळबळ उडालीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com