Kent Mango: आफ्रिकेतील केंट आंबा मुंबईतील बाजारात दाखल; किंमत ऐकून व्हाल थक्क

Africa Kent Mango In Mumbai Market: आफ्रिकेतील मालवी येथील प्रसिद्ध असलेला केंट आंबा भारतीय बाजारात दाखल झालाय. या आंब्याला मोठी मागणी असून ऐन थंडीत आंब्याची चव चाखता येणार आहे.

जगभरात मागणी असलेला आफ्रिकेतील मलावीमधील केंट प्रजातीचा आंबा भारतीय बाजारात प्रथमच दाखल झालाय. पुढील २० दिवस हा आंबा मार्केटमध्ये उपलब्ध असणार आहे. आफ्रिकेतून आयात करण्यात आलेल्या आंब्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या आंब्याला जगभरात मागणी असते. पुढील काही दिवस आंबा खवय्यांना याची चव चाखता येणार आहे. या आंब्याचे दर ७०० किलो रुपयांचा भाव आहे. एपीएमसीतील फळबाजारात २७० बॉक्स आंब्यांची आयात झालीय. ऐन थंडीत आंब्याची चव चाखता येणार आहे. मुंबईसह गुजरात आणि दक्षिण भारतात या आंब्याला मोठी मागणी आहे.हा आंबा आकाराने आणि वजनाने ४०० ग्रॅम वजनाचा असतो. मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिकिलो ७०० किलो रुपये दराने आंब्याची विक्री होत आहे. दक्षिण पूर्व आफ्रिकेतील हापूस सदृष्य व टाॅमी अटकीन हे आंबे मागील काही वर्षांपासून नोव्हेंबरमध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com